जळगाव, 12 ऑक्टोबर, (हिं.स.) घरात कोणीही नसल्याची संधी साधत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याचा क प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिरासह पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी विवाहिता घरी एकटीच असताना ऑगस्ट २०२४ मध्ये तिच्या दिराने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार विवाहितेने पती व सासूला सांगितल्यानंतर त्यांनी ‘अशा गोष्टी मला सांगायच्या नाही, तुला राहायचं असेल तर राहा नाही तर निघून जा’ असे उत्तर देत कोणालाही काही सांगितल्यास तुझे आयुष्य उदध्वस्त करून टाकू, अशी धमकी दिली. सततच्या या प्रकाराने कंटाळलेल्या या विवाहितेला पुन्हा दिराने अश्लील कृत्य करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी विवाहितेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिरासह पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर