जळगावातील व्यावसायिकाची साडेचार लाखाला फसवणूक
जळगाव, 12 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची तब्बल ४ लाख ६४ हजार ४३९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या फसव्या ॲप्लिकेशनद्वारे ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले अ
जळगावातील व्यावसायिकाची साडेचार लाखाला फसवणूक


जळगाव, 12 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची तब्बल ४ लाख ६४ हजार ४३९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या फसव्या ॲप्लिकेशनद्वारे ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले असून, या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, निलेश हेमराज सराफ (वय ४९, रा. अजय कॉलनी, रिंगरोड, जळगाव) हे खाजगी व्यवसाय करतात.अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर “कस्टमर सर्विस सपोर्ट” नावाची APK फाईल पाठवली. सराफ यांनी ती फाईल डाउनलोड करून इंस्टॉल केल्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून UPI व्यवहारांच्या माध्यमातून ४ लाख ६४ हजार ४३९ रुपये काढण्यात आले. घटनेची माहिती समजताच सराफ यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande