नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)
, नाशिक शहर व जिल्ह्यात राजस्थानी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब ते रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत शक्य तितक्या लवकर नाशिक–राजस्थान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन केंद्रीय कायदे राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी केले.
केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल नाशिक दौऱ्यावर असताना राजस्थान-हरियाणा-गुजराती प्रवासी संघाचे वतीने त्यांचे नाशिकमध्ये स्वागत करत भव्य सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन बलवीर सिंह शेखावत यांनी केले. याप्रसंगी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्री मेघवाल यांच्याशी संवाद साधत विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राजस्थान-हरियाणा-गुजराती प्रवासी संघ संघाचे संचालक तेजपालसिंह सोढा यांनी सांगितले की, नाशिकमध्ये सुमारे पाच लाख राजस्थान प्रवासी वास्तव्यास आहेत, तरीसुद्धा नाशिकहून राजस्थानसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नाही, ही खेदाची बाब आहे. मोठ्या प्रमाणावर बांधव याठिकाणी वास्तव्यास असल्याने नाशिकहून राजस्थान साठी स्वतंत्र रेल्वे कनेक्टिव्हिटी असणे नितांत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रवासी संघटनांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असून लवकरच रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी यावेळी आश्र्वासित केले.
यावेळी भगत सिंह राठौड़, मोटाराम चौधरी, पी.एम.सैनी, पुखराज चौधरी, मोहनलाल जांगिड़, बजरंग शर्मा, राम सिंह राजपूत, महेंद्र सिंह राजपूत, राजेंद्र फड, पुखराज चौधरी, विनोद बिश्नोई, जगदीश इंदौरिया, गिरधारी सिंह राजपूत शक्ति सिंह राजपुरोहित, सज्जन सिंह दयाल सिंह चौहान, चैनसिंह तंवर, सियाराम शर्मा, गोपाल राम चौधरी, रमेश बिश्नोई , नारायण सिंह राठोड यांच्यासह राजस्थान-हरियाणा-गुजराती प्रवासी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV