मराठवाडा पदवीधर नोंदणीत अडचण असल्यास संपर्क करावा - बळीराम गवते
बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात बीड जिल्ह्यातील पदवीधरांनी नाव नोंदणी करावी, यासाठी काही अडचण आल्यास संपर्क करावा, असे अवाहन राष्ट्रवादी काँ
मराठवाडा पदवीधर नोंदणीत अडचण असल्यास संपर्क करावा - बळीराम गवते


बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदार नाव नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात बीड जिल्ह्यातील पदवीधरांनी नाव नोंदणी करावी, यासाठी काही अडचण आल्यास संपर्क करावा, असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी केले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या सन २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणूकीसाठी मतदारयादी तयार करण्याचा कालबध्द कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणूकीत मतदारांची नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानूसार मराठवाड्यात पदवीधर मतदार नावनोंदणी अभियान हाती घेतले आहे.

पदवीधर मतदारसंघाचे आ.सतिष चव्हाण हे सदरील अभियानाला गती देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात देखील हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व पदवीधरांनी या अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी दरवेळी नव्याने तयार करण्यात येते. त्यामुळे गतनिवडणुकीमध्ये मतदार नोंदणी केली असेल तरीही नोंदणी करणे आवश्यक आहे. नवीन नोंदणी करिता १ नोव्हेंबर २०२२ पूर्वीचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यातील रहिवासी, असणे आवश्यक आहे.नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रात नमुना अर्ज क्र.१८, कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची 'मार्कशीट' झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र/आधार कार्ड यापैकी एकाची झेरॉक्स प्रत, नाव बदल असल्यास गॅझेट/विवाह नोंदणी प्रमाणपत्र/प्रतिज्ञापत्र, भरलेला फॉर्म नं.१८ हे आवश्यक आहेत. १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. सदरील नोंदणी तहसील कार्यालय येथे करावी लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande