जळगाव, 12 ऑक्टोबर (हिं.स.) अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू तस्करांकडून ट्रॅक्टरखाली जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल पथकासोबत गेलेले तलाठी अनंत माळी यांना वाळू तस्करांनी धक्काबुक्की करत ट्रॅक्टर खाली ओढत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना चोपडा तालुक्यातील बुधगाव-जळोद रस्त्यावर घडली. या घटनेत अनंत माळी हे जखमी झाले असून त्यांना चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाळू तस्कर ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर मालकाविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.चोपडा तालुक्यातील बुधगाव – जळोद रस्त्यावर वाळू माफियांकडून तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टरखाली जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, याप्रकरणी वाळू तस्कर ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर मालकाविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर