जळगाव, 12 ऑक्टोबर (हिं.स.) वालखेडा परिसरात जलपरी मोटार आणि कॉपर वायरची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका वालखेडा शिवारात शेतकऱ्याच्या विहिरीवर शेतीच्या कामासाठी बसवलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची जलपरी मोटार आणि कॉपर वायर ५ रोजी रात्री ११:४० च्या सुमारास चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसी खाक्या दाखवताच संशयित सुखदेव बागूल याने जलपरी मोटार व कॉपर वायर चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये २० हजारांची जलपरी मोटार, १० हजारांची कॉपर वायर आणि ७५ हजारांची दुचाकी यांचा समावेश आहे. ही कामगिरी नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र महाले, विजय आहेर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत साळुंके, विक्रांत देसले, ललित पाटील, भरत चव्हाण, सुनील पगारे, पोलिस नाईक भुरा पाटील, कॉन्स्टेबल विनोद कोळी, प्रशांत पाटील, विजय माळी, सचिन बागुल, अनिल सोनवणे यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर