अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोल्यात बिल्डिंग मटेरियल व्यवसाय करणारे रघुनाथ अरबट यांच्यासोबत विश्वासघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून बिल्डिंग मटेरियल सप्लाय व्यवसायात कार्यरत असलेल्या अरबट यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या मावस भावाने तब्बल 32 लाख रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ अरबट यांच्या व्यवसायात त्यांचा मावस भाऊ सागर कान्हेरकर कामाला होता. त्याचबरोबर सागरची पत्नी तेजस्विनी कान्हेरकर हिनेही गेल्या चार ते पाच वर्षांपासून अरबट यांच्या विश्वासात राहून काम केले होते. कामगारांना मजुरीचे पैसे देण्यासाठी रघुनाथ अरबट यांनी संपूर्ण हिशेब करून सागर कान्हेरकर याला 32 लाख रुपये दिले होते. मात्र, सागर यांनी ते पैसे मजुरांना न देता संपूर्ण रक्कम स्वतःकडे ठेवून पळ काढला, असे अरबट यांनी सांगितले.
घटनेनंतर रघुनाथ अरबट यांनी अकोला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात सागर आणि त्याची पत्नी तेजस्विनी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तब्बल सहा ते आठ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपी सागर कान्हेरकर याला अटक केली आहे.या प्रकरणी माध्यमांशी बोलताना रघुनाथ अरबट यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे