आयआरसीटीसी घोटाळा - लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.राऊस अव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाने आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार
लालूप्रसाद यादव, राबजी देवी आणि तेजस्वी यादव संग्रहित  फोटो


नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.राऊस अव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाने आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार प्रकरणात माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, १२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (पीसी कायदा) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.

न्यायालयाने राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप देखील निश्चित केले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना विचारले की, त्यांनी गुन्हा कबूल केला आहे की, खटल्याला सामोरे जाणार आहे. तिन्ही आरोपींनी त्यांचा गुन्हा नाकारला आणि सांगितले की, ते खटल्याला सामोरे जातील आणि आरोपांना आव्हान देतील.

लालू यादव रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरी येथील दोन आयआरसीटीसी हॉटेल्सच्या निविदा वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराशी संबंधित हा खटला आहे. हॉटेल वाटपाच्या बदल्यात कुटुंबाला फायदा व्हावा यासाठी जमिनीचे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे.

लालू प्रसाद यादव व्हीलचेअरवरून न्यायालयात पोहोचल्याची माहिती आहे. तेजस्वी यादव आणि राबडी हे देखील लालू यादव यांच्यासोबत न्यायालयात गेले होते. नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणातही न्यायालय लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित करण्याची अपेक्षा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे आणि त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. २४ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाने माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांचा मुलगा आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इतर आरोपींना त्या तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणातील सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २९ मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला. या प्रकरणात लालू कुटुंबातील सदस्यांविरुद्ध खटला दाखल करायचा की, नाही हे न्यायालयाच्या आदेशावरून ठरवले जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande