नाशिक शहराची इन्स्टाग्रामवर रिलद्वारे बदनामी करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल
नाशिक, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : इन्स्टाग्रामवर रिल प्रसारित करून नाशिकची बदनामी केल्याप्रकरणी दोन महिलांवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रमाकांत सुदाम सिद्धपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. १२
नाशिक शहराची इन्स्टाग्रामवर रिलद्वारे बदनामी करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल


नाशिक, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : इन्स्टाग्रामवर रिल प्रसारित करून नाशिकची बदनामी केल्याप्रकरणी दोन महिलांवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार रमाकांत सुदाम सिद्धपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. भगूर चौकी येथे आले असता ते इन्स्टाग्रामवर रिल पाहत असताना payal_pathare2001 या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन महिलांनी नाशिक शहराची बदनामी होईल, असे रिल प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी म्हटले आहे, की हे नाशिक, ये भावा, येथे जर तू इज्जत दिली, तर तुला इज्जत भेटणार. नाही तर तुझी डेड बॉडी ए ना डायरेक्ट सिव्हिलला भेटणार, हॅशटॅग नाशिककर, समझनेवाले को इशारा, ताणून मार ताणून, असे वक्तव्य करून महिलांनी नाशिक शहर हे गुन्हेगारांचे शहर असल्याचे नमूद करीत गुन्हेगारी कृत्यास व गुन्हेगारांचे उदात्तीकरण करून सामान्य जनतेस जिवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. नाशिक शहराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे नमूद करून शहराची बदनामी केली, तसेच समाजात असंतोष निर्माण करणारे वक्तव्य असलेले व्हिडिओ पोस्ट केले. या सर्व प्रकारावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार जगदाळे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande