परभणी: अवैध तलवारींसह दोनजण अटकेत
परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।परभणी जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैधरित्या तलवारींचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ तलवारी हस्तगत करून सुमारे ₹१०,०००/- किमतीचा मु
अ


परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।परभणी जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैधरित्या तलवारींचा साठा करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ तलवारी हस्तगत करून सुमारे ₹१०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थायी गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑक्टोबर रोजी सेलू उपविभागातील करजखेडा (पुनर्वसन) परिसरात छापा टाकून केली.

अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये निलेश गणपत बनगे (वय २४ वर्षे, व्यवसाय – मच्छीमारी, रा. राजवाडी, ह.मु. करजखेडा पुनर्वसन, सेलू), गणेश कोंडीबा परसे (वय २३ वर्षे, व्यवसाय – मच्छीमारी, रा. शेवडी, ता. मानवत, ह.मु. करजखेडा पुनर्वसन, सेलू) अशी नावे आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या तलवारींचा साठा करून विक्रीसाठी ठेवत असल्याचे समोर आले. दोघांच्या ताब्यातून एकूण ५ तलवारी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१०/२०२५ नोंदवण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत स्थायी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, स.पो.नि. रामेश्वर धोंडगे, तसेच पोलीस अंमलदार विलास सातपूते, संजय घुगे, जयश्री आव्हाड, सिध्देश्वर चाटे, उमेश चव्हाण, मधुकर ढवळे, राम पौळ, नामदेव डुबे (सर्व नेमणूक स्था.गु.शा.) आणि गणेश कौटकर (सायबर सेल, परभणी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande