बीड - पिंपळनेर पोलिसांची तिरंट जुगारावर कारवाई; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त
बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)बीड जिल्ह्याच्या पिंपळनेर पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे तिरंट नावाचा जुगार खेळणाऱ्या ५ जणांवर यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ७६ हजार ५१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​पोलीस स्टेशन पिंपळनेर
9b293b71b895e530127d30e578090799_157703876.jpg


बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)बीड जिल्ह्याच्या पिंपळनेर पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे तिरंट नावाचा जुगार खेळणाऱ्या ५ जणांवर यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ७६ हजार ५१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​पोलीस स्टेशन पिंपळनेर येथे कार्यरत गोपनीय अंमलदार पोशि/ ४६८ संतोष वामन तावरे यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार, मौजे म्हाळसजवळा ते पिंपळनेर जाणाऱ्या रस्त्यावर सारंग खांडे यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली काही इसम पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.

​प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांना ही माहिती कळवल्यानंतर, पोलीस उप निरीक्षकअर्जुन गोलवाल, दिगांबर मेखले आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने १४.३५ वाजता खाजगी वाहनाने घटनास्थळी छापा टाकला.पोलीस पथकाला पाहताच जुगार खेळणारे पाच इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

​ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व गुन्हे:

​ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये खालील पाच इसमांचा समावेश आहे:

१. नितीन चिंतामन खांडे (वय ४५, रा. पिंपळगाव मजरा, ता. जि. बीड)

२. राजेंद्र भगवान खांडे (वय ३५, रा. म्हासापुर तांडा, ता. जि. बीड)

३. संभाजी गोपीचंद खांडे (वय ३४, रा. पिंपळगाव मजरा, ता. जि. बीड)

४. अनिल रामा कोरडे (वय ३६, रा. म्हाळसापुर, ता. जि. बीड)

५. शिवाजी गोपीचंद खांडे (वय ३४, रा. पिंपळगाव मजरा, ता. जि. बीड)

​या आरोपींकडून आणि जुगाराच्या ठिकाणावरून खालीलप्रमाणे एकूण २,७६,५१० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​रोख रक्कम: त्यांच्या अंगझडतीतील रोख रक्कम व जुगार खेळण्याच्या जागेवरची रोख रक्कम

​दोन मोटारसायकली: रॉयल इन्फिल्ड (बुलेट) (क्र. MH23AK7950) आणि होंडा शाईन

​चार मोबाईल फोन: ओपो (२), रियल मी (१) आणि सॅमसंग (१)

​जुगाराचे साहित्य: ५२ पत्त्यांची गड्डी

​पोलीस शिपाई संतोष वामन तावरे यांच्या फिर्यादीवरून, सर्व आरोपींविरुद्ध कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशन करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande