आरसीएमच्या ‘रूपांतरण यात्रा’ला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
सेवाभाव, आरोग्य जनजागृती आणि जीवनमूल्यांचा प्रभावी प्रसार नागपूर, १३ ऑक्टोबर (हिं.स.): आरसीएम कंपनीच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित देशव्यापी ‘रूपांतरण यात्रा’ महाराष्ट्रातील नागपूर येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्
आरसीएमच्या ‘रूपांतरण यात्रा’ला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद


सेवाभाव, आरोग्य जनजागृती आणि जीवनमूल्यांचा प्रभावी प्रसार

नागपूर, १३ ऑक्टोबर (हिं.स.):

आरसीएम कंपनीच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित देशव्यापी ‘रूपांतरण यात्रा’ महाराष्ट्रातील नागपूर येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, असोसिएट खरेदीदार आणि विविध समुदायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सध्या RCM कडे देशभरात २० लाखांहून अधिक सक्रिय असोसिएट खरेदीदार आहेत आणि कंपनीचे उद्दिष्ट ही संख्या आणखी वाढविण्याचे आहे. महाराष्ट्रातील वाढता नेटवर्क हे आरसीएमच्या परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांवरील वाढत्या विश्वासाचे प्रतीक ठरत आहे.

समुदायाचा सहभाग आणि सामाजिक भान

नागपूरमधील कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये विभागले होते.

पहिल्या टप्प्यात आरोग्य, सेवा आणि संस्कार यावर आधारित विविध उपक्रम राबवले गेले. यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन, आरोग्य जनजागृती, आणि जीवनमूल्यांवर आधारीत चर्चासत्रे यांचा समावेश होता.

दुसऱ्या टप्प्यात ‘रूपांतरण मेळा’ आयोजित करण्यात आला, जिथे आरसीएमच्या उत्पादनांचे प्रदर्शन, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी पाहायला मिळाली.

हेल्थ झोन मध्ये Nutrisharge आणि Gamma सारख्या आरोग्यवर्धक उत्पादनांची माहिती देण्यात आली. Kisole Pavilion मध्ये महिलांच्या वस्त्रप्रावरणांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले. तसेच Swachha आणि Good Dot ब्रँड अंतर्गत स्वादिष्ट, शाकाहारी आणि पौष्टिक पदार्थांनी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

प्रेरणादायी प्रवास आणि व्यक्तिमत्त्वांचा गौरव

या यात्रेचा उद्देश केवळ उत्पादन विक्री नसून, समाजपरिवर्तन आणि लोकसशक्तीकरण आहे. या कार्यक्रमात आरसीएमच्या माध्यमातून यशस्वी झालेले अनेक युवक, महिला उद्योजक आणि समुदाय नेत्यांचा सत्कार करण्यात आला.

नुकतेच प्रकाशित झालेले “मनसा वाचा कर्मणा – एक कर्मयोगी की जीवनी” हे आरसीएमचे संस्थापक तिलोकचंद छाबड़ा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक सुद्धा यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.

नेतृत्त्वाचे विचार

आरसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ छाबड़ा यांनी सांगितले की,“नागपूरमधील उत्स्फूर्त प्रतिसाद हा आमच्या लोकशक्तीवर आधारित चळवळीच्या सामर्थ्याचा आणि आत्म्याचा प्रत्यय आहे. आम्ही प्रत्येक कुटुंबाला चांगले आरोग्य, आर्थिक संधी आणि दृढ जीवनमूल्ये प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

व्यवस्थापकीय संचालक प्रियंका अग्रवाल म्हणाल्या की,“या यात्रेचा प्रत्येक टप्पा महिलांना सन्मान, सामर्थ्य आणि आत्मविश्वास देण्याचे उद्दिष्ट साधतो, जेणेकरून त्या नवभारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊ शकतील.”

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की,“नागपूरमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि उमेद पाहून मला अभिमान वाटतो. मला विश्वास आहे की ही यात्रा भारतभर लाखो लोकांना सशक्त करेल.”

पुढील टप्प्याकडे वाटचाल

१७,००० किमीचा प्रवास, १०० दिवसांची यात्रा, ७५ शहरे आणि २५ प्रमुख कार्यक्रम अशा भव्य रूपात साकारलेली ही ‘रूपांतरण यात्रा’ आता पुढील गंतव्यांकडे वाटचाल करत आहे. नागपूरमधून घेतलेली ऊर्जा आणि प्रेरणा ही येत्या काळात नव्या संधींच्या द्वारांचे उद्घाटन करेल आणि समग्र सामाजिक प्रगतीस चालना देईल.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande