शिक्षण हे काही लोकांसाठी विशेषाधिकार नसावा - राहुल गांधी
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : “शिक्षणाची सुरुवात कुतूहल आणि मोकळ्या मनाने होते. आपल्याला असे वातावरण हवे आहे जिथे मुले भीती किंवा दबावाशिवाय प्रश्न विचारू शकतील. शिक्षण हे काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नसावा, कारण तो स्वातंत्र्याचा खरा पाया
Rahul Gandhi


नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : “शिक्षणाची सुरुवात कुतूहल आणि मोकळ्या मनाने होते. आपल्याला असे वातावरण हवे आहे जिथे मुले भीती किंवा दबावाशिवाय प्रश्न विचारू शकतील. शिक्षण हे काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नसावा, कारण तो स्वातंत्र्याचा खरा पाया आहे.” असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दक्षिण अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले त्यांनी शिक्षण, लोकशाही आणि स्वातंत्र्य याबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले.

राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की प्रत्येक मुलाला शिकण्याचे आणि विचार करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. शिक्षण हे केवळ श्रीमंत किंवा काही मोजक्या लोकांपुरते मर्यादित राहू नये. भारताने लोकशाही वातावरणात भरभराटीला येणारी नवी उत्पादन व्यवस्था निर्माण करावी, असेही त्यांनी मत व्यक्त केले. यासाठी अमेरिका किंवा पेरूसारख्या देशांसोबत भागीदारी फायदेशीर ठरू शकते, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. काँग्रेस पक्षाने रविवारी राहुल गांधी यांनी पेरूच्या पोंटिफिकल कॅथोलिक विद्यापीठ आणि चिली विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी केलेल्या संवादाचा १२ मिनिटे १९ सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये शिक्षण, लोकशाही आणि जगातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या कोलंबिया, ब्राझील, पेरू आणि चिली या दक्षिण अमेरिकन देशांच्या १० दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध विद्यापीठांमध्ये हजेरी लावून भारतीय आणि जागतिक राजकारण, शिक्षण तसेच सामाजिक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ८ ऑक्टोबर रोजी त्यांनी कोलंबियातील मेडेलोन येथील पेर्गामिनो कॉफी शॉपला भेट दिली. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते स्वतः कॉफी बनवण्याचा अनुभव घेताना दिसतात. “भारतातही खास कॉफीची शक्यता आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणताना दिसतात, “पेर्गामिनो येथे मला शिकवण्यात आले की प्रत्येक कप कॉफी हा विज्ञान आणि सर्जनशीलतेचा मिलाफ आहे. कोलंबियामध्ये ५ लाख कुटुंबे कॉफीला केवळ पीक म्हणून नव्हे तर जीवनशैली म्हणून जगतात. त्यांची कला ही देशाची ओळख आहे.” राहुल गांधी यांनी भारतातील कॉफी उत्पादनाचा संदर्भ देताना सांगितले की, “वायनाड आणि कुर्गच्या टेकड्यांपासून ते अराकू आणि निलगिरीपर्यंत भारतातही अशीच क्षमता आहे. आपल्या समृद्ध माती आणि मेहनती शेतकऱ्यांसह आपण जागतिक स्तरावर विशेष कॉफी कहाणी तयार करू शकतो.” २ ऑक्टोबर रोजी कोलंबियातील ईआयए विद्यापीठात ‘द फ्युचर इज टुडे’ या परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपच्या विचारसरणीवर टीका केली. त्यांनी म्हटले, “आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीचा गाभा भ्याडपणा आहे. २०२३ मध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आपल्यापेक्षा शक्तिशाली असल्याचे विधान केले. ही विचारसरणी भ्याडपणात रुजलेली आहे. ते दुर्बलांवर हल्ला करतात आणि शक्तिशाली लोकांपासून पळून जातात. हा भाजपचा स्वभाव आहे.” दक्षिण अमेरिकेतील दौऱ्यात राहुल गांधी यांनी शिक्षण, स्वातंत्र्य, लोकशाही आणि भारतीय मूल्यांवरील आपले विचार मांडत जागतिक पातळीवर भारताच्या भावी दिशा आणि क्षमतेचा संदेश दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande