रॉयल एनफिल्डची ‘हिमालयन 750’ लवकरच होणार सादर
मुंबई, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। टूरिंग प्रेमींसाठी रॉयल एनफिल्ड एक नवा सरप्राइज घेऊन येत आहे. कंपनीची बहुप्रतिक्षित बाईक ‘हिमालयन 750’ अखेर लॉन्चसाठी सज्ज झाली आहे. सध्या या बाईकचे टेस्टिंग सुरू असून, टेस्टिंगदरम्यान ती अनेक वेळा स्पॉट झाली आहे. विशेष
Royal Enfield Himalayan 750


मुंबई, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। टूरिंग प्रेमींसाठी रॉयल एनफिल्ड एक नवा सरप्राइज घेऊन येत आहे. कंपनीची बहुप्रतिक्षित बाईक ‘हिमालयन 750’ अखेर लॉन्चसाठी सज्ज झाली आहे. सध्या या बाईकचे टेस्टिंग सुरू असून, टेस्टिंगदरम्यान ती अनेक वेळा स्पॉट झाली आहे. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात होणाऱ्या EICMA 2025 (6 ते 9 नोव्हेंबर, मिलान, इटली) या प्रतिष्ठित ऑटो शोमध्ये रॉयल एनफिल्ड आपली ही नवी ॲडव्हेंचर टूरिंग बाईक सादर करणार आहे. गेल्या वर्षीच्या EICMA 2024 मध्ये कंपनीने क्लासिक 650, बिअर 650 आणि पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘फ्लाइंग फ्ली C6’ सादर केली होती. यावेळी कंपनीच्या ‘पॉवर बीस्ट’ हिमालयन 750 कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

EICMA नंतर रॉयल एनफिल्ड आपल्या या बाईकचे भारतातील अनावरण गोवा मोटोवर्स 2025 (21 ते 23 नोव्हेंबर) या इव्हेंटमध्ये करण्याची शक्यता आहे. नवीन हिमालयन 750 ही सध्याच्या हिमालयन 450 चे अपग्रेडेड आणि अधिक पॉवरफुल व्हर्जन असेल. तिचा एकूण स्टान्स अधिक रुंद आणि रग्ड असेल, ज्यामुळे ती ॲडव्हेंचर टुरिंग सेगमेंटमध्ये एक प्रिमियम मशीन ठरेल. बाईकच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, तिला क्लासिक पण दमदार लुक देण्यात आला आहे. यात गोल एलईडी हेडलॅम्प, हाय विंडस्क्रीन, मोठा फ्युएल टँक, एडीव्ही-स्टाइल साइड पॅनेल्स, स्टेप्ड सीट आणि मजबूत लगेज रॅक मिळणार आहे. ही सर्व वैशिष्ट्ये तिला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आदर्श बनवतात.

रॉयल एनफिल्डने आपल्या 650 ट्विन इंजिनच्या आधारे 750 सीसीची उच्च क्षमतेची मोटर विकसित केली आहे. या नव्या इंजिनमध्ये हलके वजनाचे कंपोनन्ट वापरण्यात आले असून, उत्कृष्ट थर्मल मॅनेजमेंट आणि कमी वायब्रेशनवर विशेष भर दिला आहे. हे इंजिन सुमारे 50 बीएचपी इतकी शक्ती आणि 65 एनएम टॉर्क निर्माण करेल. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून, दीर्घ टूरिंग आणि हायवे राइडसाठी हे उत्तम ठरेल.

नव्या हिमालयन 750 साठी पूर्णतः नवीन चेसि तयार करण्यात आली आहे, जी 650 ट्विन्सच्या स्ट्रक्चरवर आधारित आहे. यात पुढील बाजूस लाँग-ट्रॅव्हल USD फोर्क्स, मागील बाजूस प्रीलोड ऍडजस्टेबल मोनोशॉक्स दिले आहेत, तर ब्रेकिंगसाठी फ्रंट ट्विन डिस्क आणि रिअर सिंगल डिस्क सेटअप मिळेल. हे सस्पेंशन सेटअप हिमालयन 450 पेक्षा अधिक ट्युन करण्यायोग्य आणि ऑफ-रोड राइडिंगसाठी उपयुक्त असेल.

हिमालयन 750 ही केवळ पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतच नव्हे, तर तंत्रज्ञान आणि आरामदायी राइड अनुभवाच्या दृष्टीनेही रॉयल एनफिल्डच्या बाईक मालिकेत नवे पर्व ठरू शकते. तिच्या दमदार इंजिन, सुधारित सस्पेंशन आणि आधुनिक डिझाइनमुळे ही बाईक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त प्रतिसाद मिळवेल, अशी अपेक्षा आहे. टूरिंग आणि ॲडव्हेंचर राइडिंग प्रेमींसाठी ही बाईक खरोखरच “पॉवर बीस्ट” ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande