अस्वस्थ वाटत असल्याने संजय राऊत रुग्णालयात दाखल
मुंबई, 13 ऑक्टोबर (हिं.स.) - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी फोर्टिज रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अस्वस्थ वाटत
संजय राऊत


मुंबई, 13 ऑक्टोबर (हिं.स.) - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी फोर्टिज रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने फोर्टिज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. राऊत यांना आज अचानक रुग्णालयात का दाखल केले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज, सोमवारी सकाळीच राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande