कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द
चेन्नई, 13 ऑक्टोबर (हिं.स.) तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द केला आहे. आणि कंपनी कायमची बंद करण्याची घोषणा केली आहे. सरकारने श्रीसन फार्मा कारखान्यात ३५० हून अधिक गंभीर अनियमित
श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन


चेन्नई, 13 ऑक्टोबर (हिं.स.) तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द केला आहे. आणि कंपनी कायमची बंद करण्याची घोषणा केली आहे. सरकारने श्रीसन फार्मा कारखान्यात ३५० हून अधिक गंभीर अनियमितता आढळल्या आहेत.

कोल्ड्रिफ सिरप प्यायल्याने मध्य प्रदेशात आतापर्यंत २५ मुलांचा मृत्यू झाला आहे. चेन्नईतील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज श्रीसन फार्माशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकले. श्रीसन फार्माचे प्रमुख कर्मचारी आणि तामिळनाडू अन्न आणि औषध प्रशासन (टीएनएफडीए) चे अटक केलेले प्रभारी संचालक पी.यू. कार्तिकेयन यांच्या जागेवरही छापे टाकण्यात आले.कार्तिकेयन यांना जुलै २०२५ मध्ये लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. भेसळयुक्त कोल्ड्रिफ सिरपच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ईडीची नवीनतम कारवाई केली जात आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश पोलिस रविवारी संध्याकाळी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना घेऊन तामिळनाडूला रवाना झाले. त्यांना ९ ऑक्टोबर रोजी चेन्नईतील कोडंबक्कम येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली होती.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननुसार, श्रीसन फार्माला २०११ मध्ये तामिळनाडू फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनकडून परवाना मिळाला. ही कंपनी कांचीपुरममधील एका लहान लोखंडी शेड कारखान्यात कोल्ड्रिफ सिरप तयार करत होती. ज्याचं क्षेत्रफळ फक्त २००० चौरस फूट होता.

अनेक राष्ट्रीय औषध सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही कंपनी एका दशकाहून अधिक काळ कोणत्याही निर्बंधांशिवाय कार्यरत होती. राज्य औषध नियंत्रण विभागाच्या तपासणीदरम्यान श्रीसनच्या उत्पादन युनिटला औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गुणवत्ता मानकांमध्ये असंख्य कमतरता आढळल्या.

या सिरपमध्ये मोठ्या प्रमाणात डायथिलीन ग्लायकोल भेसळ आढळून आली. ७ ऑक्टोबर रोजी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाने सिरप तयार करणाऱ्या कंपनी श्रीसन फार्माला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सरकारने कंपनीकडून पाच दिवसांत उत्तर मागितले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande