परभणी : मानवत:कर्जाच्या विवंचनेत तरुणाची आत्महत्या
परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : मानवत तालुक्यातील सावरगाव येथील एका कर्जाच्या विवंचनेत तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सावरगाव (ता. मानवत) येथील 27 वर्षीय वैभव बाबासाहेब काळे या तरुणाने बँकेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून विहिरीत उडी घेऊ
परभणी : मानवत:कर्जाच्या विवंचनेत तरुणाची आत्महत्या


परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : मानवत तालुक्यातील सावरगाव येथील एका कर्जाच्या विवंचनेत तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सावरगाव (ता. मानवत) येथील 27 वर्षीय वैभव बाबासाहेब काळे या तरुणाने बँकेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. ग्रामीण बँकेचे कर्ज झाल्याने तो काही दिवसांपासून तणावात होता. याप्रकरणी कठाळू परबतराव काळे यांच्या माहितीवरून मानवत पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande