नांदेड - श्री पाळज गणपती देवस्थानकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
नांदेड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। भोकर तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र श्री पाळज गणपती देवस्थान तर्फे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्
नांदेड - श्री पाळज गणपती देवस्थानकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात


नांदेड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। भोकर तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र श्री पाळज गणपती देवस्थान तर्फे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, तहसीलदार विनोद गुंडमवार, तसेच देवस्थानचे अध्यक्ष रघुवीर बंदेलवाड, लक्ष्मण वझलवाड, राजेश्वर न्यालमवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात देवस्थानकडून दिलेला हा आर्थिक हातभार समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले असून, देवस्थान समितीच्या या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande