पुणे विद्यापीठात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन
पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून प्रख्यात असलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश
पुणे विद्यापीठात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन


पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून प्रख्यात असलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पराग काळकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले.

यावेळी वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, अधिसभा सदस्य श्री. कृष्णाजी भंडलकर , अधिष्ठाता प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, संचालक व विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, विद्यावाणीचे संचालक श्रीदत्त गायकवाड तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande