महाभारतात 'कर्णा'ची भूमिका साकारणारे अभिनेता पंकज धीर यांचे निधन
मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेले अभिनेते पंकज धीर यांचे आज, बुधवारी निधन झाले. पंकज धीर अनेक वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होते, अखेर आज ६८ व्या वर
अभिनेता पंकज धीर


मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेले अभिनेते पंकज धीर यांचे आज, बुधवारी निधन झाले. पंकज धीर अनेक वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होते, अखेर आज ६८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.पंकज धीर यांच्या निधनाची माहिती त्यांचे मित्र आणि ‘महाभारत’मधील अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

माहितीनुसार, पंकज धीर यांना कॅन्सर होता यामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती सुधारली नाही, आणि शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज सायंकाळी ४:३० वाजता पवनहंस येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘महाभारत’ मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारे फिरोज खान यांनी पंकज धीर यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पंकज आणि फिरोज हे प्रत्यक्ष आयुष्यातही घनिष्ठ मित्र होते. आपल्या मित्राच्या निधनावर शोक व्यक्त करताना फिरोज खान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “अलविदा मेरे दोस्त… आम्ही तुम्हाला खूप मिस करू.”

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून पंकज धीर ओळखले जात होते. केवळ टीव्हीच नव्हे, तर चित्रपटांमध्येही त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर आणि मित्रमंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अनेकजण सोशल मीडियावर पंकज यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande