जळगाव : पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू
जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : भादली ते भोकर रस्त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या अपघातात पायी जाणाऱ्या एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला
जळगाव : पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू


जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : भादली ते भोकर रस्त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या अपघातात पायी जाणाऱ्या एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश नाना बारेला (वय ४५, रा. भोकर) हे रात्री पायी घरी जात होते. दरम्यान, एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्रकाश बारेला गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जळगाव तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास तालुका पोलिस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande