रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरीला येणार आ हेत.
श्री. शिंदे गुरुवारी सकाळी १० वाजता दरे हेलिपॅड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीला येतील. सकाळी ११.१५ वाजता रत्नागिरीतील तारांगण कोकणातील भारतरत्न शिल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वाजता ते शिवसेना कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी सव्वादोन वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून दुपारी ३ वाजता ते मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे रवाना होतील. तेथून ते पुन्हा दरे (ता. महाबळेश्वर) येथे रवाना होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी