- गवळी रविना चमकली
नांदेड, 15 ऑक्टोबर (हिं.स.) -
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व सायन्स कॉलेज नांदेड,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे.
देगलूर महाविद्यालय, देगलूर चे खेळाडू मुली कु.गवळी रविना धावणे क्रीडा प्रकारात 400मी रौप्य पदक, 800मी कांस्य पदक, कु. गवळी रीना 200मी कांस्य पदक तर 4x100 रिले निवड चाचणी मध्ये प्रथम आली आहे. तसेच मुलांमध्ये गवळी रोहन हा 400मी रौप्य पदक,व 4x 400 मी रिले रौप्य पदक तसेच साई बेतीवार हा 200मी धावणे मध्ये कांस्य पदक पटकवले आहे तर 4x400 मी मध्ये रौप्य पदक व 4x100 मी रिले मध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून डॉ.निरजकुमार उपलंचवार तर प्रा वावधाने दिपक,प्रा.हाके सिताराम,यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis