परभणी - गणेश वाचनालयातर्फे वाचकांसाठी दिवाळी अंक उपलब्ध
परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। गणेश वाचनालय परभणी यांच्या वतीने दिवाळी अंक योजना राबविण्यात येणार आहे, यामध्ये वाचकांना १०० अंकाची मेजवाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आताच्या वाढलेल्या दिवाळी अंकाच्या किंमती पाहता वाचकांना सर्व अंक घेणे शक्य नाही,
गणेश वाचनालयातर्फे वाचकांसाठी दिवाळी अंक उपलब्ध


परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। गणेश वाचनालय परभणी यांच्या वतीने दिवाळी अंक योजना राबविण्यात येणार आहे, यामध्ये वाचकांना १०० अंकाची मेजवाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आताच्या वाढलेल्या दिवाळी अंकाच्या किंमती पाहता वाचकांना सर्व अंक घेणे शक्य नाही, आपली वाचनाची भुक भागविण्यासाठी वाचकांना लायब्ररी हाच पर्याय आहे, या करीताच “गणेश वाचनालयाने माफक फी मध्ये वाचनालयात उपलब्ध सर्व दिवाळी अंक वाचा” ही योजना वाचकांसाठी उपलब्ध केली आहे. रसिक वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडगावकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande