दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावे : परभणी जिल्हाधिकारी
परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिव्यांग वैश्व
दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावे : परभणी जिल्हाधिकारी


परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र वाटप शिबिर व दिव्यांगा प्रती संवेदनशीलता व जागृती या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी एस.बी. पांचाळ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी.एम. लांडे उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले की, दिव्यांग बांधव आपल्यातलाच एक माणूस असून त्यांच्यामधील प्राविण्य ओळखून त्यांना सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे. दिव्यांग बांधवांना मदत करताना त्यांचा स्वाभिमान दुखवला जाणार नाही, यांची काळजी आपण घेतली पाहिजे. दिव्यांग बांधवाना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळण्यासाठी प्रशासनाकडून निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. दिव्यांगासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासणार नाही याची दक्षता समाजातील प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande