“एक हात मदतीचा” आवाहनाला नंदुरबारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार, 15 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क
“एक हात मदतीचा” आवाहनाला नंदुरबारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद


नंदुरबार, 15 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या “एक हात मदतीचा” या आवाहनाला जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी दिली.

या अभियानांतर्गत आज रोजी माय चाईल्ड पब्लिक स्कूल, नंदुरबार यांच्यातर्फे रुपये 23 हजारचा धनादेश

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सुपूर्त करण्यात आला आहे.

यापूर्वीही जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी या मदतकार्याला हातभार लावला आहे. आजपर्यंत

मदत करणाऱ्यांमध्ये पुढील व्यक्ती आणि संस्थांचा समावेश आहे:

 सतिश नारायण काशीद रुपये 5 हजार

 जिल्हा परीषद केंद्र शाळा परीवर्धे, ता. शहादा, जि. नंदुरबार रुपये 5 हजार 162

 गजानन फायबर प्रा.लि. तर्फे अशोक चौधरी रुपये 25 हजार

 नारायण कोटेक्स प्रा.लि. तर्फे गिरीश अग्रवाल रुपये 25 हजार

 नमन कॉटन तर्फे मनिष अग्रवाल रुपये 25 हजार

 जितेंद्र मदनलाल जैन कापड व्यापारी, नंदुरबार रुपये 5 हजार 100

या सर्व दानशूर व्यक्ती व संस्थांचे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे

अध्यक्ष डॉ. धामणे यांनी त्यांचे आभार मानले असून ही दिलेली मदत पुरग्रस्त बाधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कटीबद्ध आहे, असेही त्यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande