नांदेड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
शहापूर (ता. देगलूर) येथील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत नागोराव माडपते यांनी बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दुर्दैवी आत्महत्या केली.
शेतकरी चंद्रकांत माडपते यांनी केलेल्या आत्महत्येनंतर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी
आज माडपते कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे दुःख समजून घेतले व त्यांना मनोबल दिले.
यावेळी पंचायत समिती सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल पाटील (खानापूर), बालाजी कनंकटे, गंगारेड्डी कोटगिरे
शहापूरचे सरपंच लक्ष्मण भंडारे, देगलूरचे तहसीलदार भरत सुर्यवंशी, अंबादास पाटील नरगंलकर, गावकरी, स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माडपते कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis