मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। या दिवाळीत गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कोणत्याही विशिष्ट ब्रँडशी न जोडलेल्या मीडिया प्रॉपर्टी Godrej L’Affaire ने त्यांची #CelebratingAcceptance मोहिम पुढे सुरु ठेवत ‘कांता दीदी’ ही फिल्म सादर केली आहे. ही फिल्म दैनंदिन जीवनातील रूढ कल्पनांना आव्हान देते आणि आजच्या काळातील स्वीकृती/स्वीकार कसा असू शकतो हे नव्याने परिभाषित करते. कारण स्वीकृती म्हणजे केवळ जागरूकता निर्माण करण्यासाठीची विशेष गोष्ट नाही तर ती मानवतेची कृती आहे. परिचित घराच्या आरामदायक भिंतींमध्ये घडणारी ही कथा एका घरकाम करणाऱ्या महिलेची आणि एका क्विअर जोडप्याची (असं जोडपं जे समाजातील पारंपरिक स्त्री-पुरुष जोडप्याच्या चौकटीबाहेर असते) आहे. इथे समजून घेणे विचारधारांमधून नाही तर अंत:प्रेरणेवरून कसे उगम पावते हे दाखवले आहे. एका क्षणिक संकोचाने सुरू होणारी फिल्म समजून घेणं आणि स्वीकृती यांच्या अनपेक्षित कथेत बदलते.
कथेच्या केंद्रस्थानी आहे कांता दीदी. एक घरकाम करणारी महिला जी पहिल्यांदाच आपल्या कामाच्या ठिकाणी एका क्विअर जोडप्याला भेटते. ती कपिलशी संवाद साधते. तो या नव्या परिसरात नुकताच रहायला आलेला असल्यामुळे थोडासा गोंधळलेला असतो. घरकामासाठी त्याला मदत हवी आहे. कांता दीदीला लगेचच वाटते की कपिलचा विवाह झाला आहे किंवा तो एखाद्या स्त्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे, पण वास्तव त्यापेक्षा खूप वेगळं असतं. कपिलला सुरुवातीला आपलं खरं वास्तव सांगताना संकोच वाटतो, पण कांता दीदीच्या कनवाळूपणामुळे तो संकोच नाहीसा होतो. कपिल जेव्हा स्वतःची ओळख उघड करतो, तेव्हा दोघांमध्ये एक प्रामाणिक संवाद घडतो. कांता दीदींचे साधे पण स्वीकृतीने भरलेले शब्द कपिलचा आत्मविश्वास वाढवतात. “अच्छा, बॉयफ्रेंड आहे? तोह मेरेको क्या?” तिची ही सहज प्रतिक्रिया ‘जगा आणि जगू द्या’ या साध्या जीवनतत्त्वाचे दर्शन घडवते. प्रेमावर नियंत्रण ठेवता येत नाही, कारण ती एक मूलभूत मानवी भावना आहे. ती प्रत्येक रूपात जोपासली गेली पाहिजे. कांता दीदी कपिलला आश्वस्त वाटायला लावते; तिच्या सहज स्वीकृतीमुळे कपिलचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो. हा संवाद दररोजच्या भारताचे खरे रूप दाखवतो — जिथे बदल मोठ्या घोषणांमधून नव्हे तर छोट्या, प्रामाणिक मानवी क्षणांमधून घडतो.
ही फिल्म #CelebratingAcceptance या आमच्या मागील दिवाळी मोहिमेतील फिल्मच्या महत्वपूर्ण संवादाला पुढे नेते. सहानुभूती ही सर्वांत खाजगी आणि घरगुती परिस्थितीत जन्म घेते ही भावना इथे प्रस्थापित होते. “आपके वो प्राईड परेड में क्या मस्त दिखते है सब लोग रेनबो फ्लॅग के साथ!” असं म्हणत जर कांता दीदी, जी क्विअर जीवनाबद्दल समाजमाध्यमांमधून आणि रोजच्या अनुभवांतून शिकते तर मग कोणासाठीही स्वीकृती कठीण का असावी? एजन्सी 09 द्वारे संकल्पित ही फिल्म दर्शकांना या दिवाळीत प्रेमातली एकता आणि जाणीव समाजाला समृद्ध करू शकते या भावनेने जोडते. आपण आपल्या घरातील मदतनीसांपासून, सपोर्ट स्टाफपासून ते आपल्या मित्र आणि कुटुंबीयांपर्यंत सर्वांसोबत प्रेमाच्या विविध स्वरूपांवर प्रामाणिक संवाद #honestconversations सुरू करण्याचे आवाहन ही फिल्म समाजाला करते. कांता दीदीचं म्हणणं योग्यच आहे, “रिवाजों से रिश्ते नहीं बनते, हम रिश्तों से रिवाज बनाते हैं.” हे वाक्य आपल्याला सण, उत्सव हे विधी, कर्मकांडांनी नाही तर नात्यांनी परिभाषित होतात याची आठवण करून देते.
या मोहिमेबद्दल बोलताना गोदरेज DEI Lab चे प्रमुख पार्मेश शाहाणी म्हणाले, “#CelebratingAcceptance फिल्म्स दैनंदिन बदल सुंदरपणे दाखवतात आणि क्विअर सन्मान व स्वीकृतीच्या वाढत्या मान्यतेचा उत्सव साजरा करतात. धोरणातून कृतीत रूपांतर झाल्यावरच खरी प्रगती घडते, हा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
यावर अधिक भाष्य करताना Onlyn India चे डायरेक्टर राज रहमान अली म्हणाले, “कांताबाईचा प्रामाणिकपणा आणि साध्या संवादातील ताकद हीच फिल्मची खरी शक्ती आहे. मोठमोठ्या प्रसंगांशिवाय जीवनाच्या सहज कथांमधूनच खरी सहानुभूती उलगडते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule