सेवांची गुणवत्ता व लोकाभिमुखता वाढवा-दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणि पारदर्शकता वाढवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. जिल्ह
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता आणि पारदर्शकता वाढवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धा व जिल्हा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिकेचे अपर आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, शिक्षण विभागाचे उपसंचालक प्रकाश मुकुंद, कृषी विभागाचे उपसंचालक गवळी, जिल्हा दुग्धविकास विभागाच्या सहायक आयुक्त मनीषा हराळ तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना लोकाभिमुख सुविधा उपलब्ध करून ई ऑफिस द्वारे जास्तीत जास्त सेवा ह्या तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या. नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल स्पर्धेमध्ये घेतली जावी यासाठी महसूल विभागाबरोबरच जिल्हा प्रशासन, महानगरपालिका ,पोलीस प्रशासन, शिक्षण, आरोग्य विभाग कृषी ,उद्योग या विभागांनी देखील आपले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे. छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबित आहे यामध्ये प्रशासनाने केलेल्या उपक्रमाची दखल शासन स्तरावर व्हावी हा यामागचा हेतू असून प्रत्येक विभागामार्फत पथदर्शी कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे त्या उपक्रमाच्या संदर्भात सविस्तर सादरीकरण आणि प्रस्ताव सादर करावेत. याबाबत असणाऱ्या तांत्रिक त्रुटी ही दूर करून संबंधित कार्यालय प्रमुखांनी याबाबतची काळजी घ्यावी असे निर्देश स्वामी यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande