भारतीय महिला संघाला आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावला दंड
दुबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल भारतीय महिला संघाला त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या विक्रमी आव्हानाचा पाठ
भारतीय महिला क्रिकेट संघ


दुबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल भारतीय महिला संघाला त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या विक्रमी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सने पराभव केला होता.

रविवारी इंदूरमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताला जिंकणे आवश्यक आहे. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताने निर्धारित वेळेपेक्षा एक षटक कमी टाकल्यामुळे एमिरेट्स आयसीसी इंटरनॅशनल पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या मिशेल परेरा यांनी दंड ठोठावला आहे. आता भारतीय संघातील क्रिकेटपटूंना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

आयसीसीने म्हटले आहे की, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने दंड स्वीकारला आहे आणि गुन्हा कबूल केला आहे.आणि त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande