कार्तिकी यात्रेसाठी शासकीय महापुजेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण
सोलापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।कार्तिकी यात्रा एकादशी दि. 2 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. महापूजेचे निमंत्रण उपमुख
कार्तिकी यात्रेसाठी शासकीय महापुजेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण


सोलापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।कार्तिकी यात्रा एकादशी दि. 2 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. महापूजेचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande