जालना : जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। नागरिकांसाठी पाणी पूरवठा हा महत्वाचा विषय असून, जिल्ह्याकरीता जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली पाणी पूरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिल्या. जिल्हाधिक
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। नागरिकांसाठी पाणी पूरवठा हा महत्वाचा विषय असून, जिल्ह्याकरीता जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली पाणी पूरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षेत आज जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीद्वारे आयोजित जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीती मैत्रेवार बोलत होत्या. यावेळी जिप ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाचे सहायक भूविज्ञानिक श्री. गिरीधरा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तालूका उप अभियंता आदींची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद आणि जालना या तालूक्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पूरवठा योजनेची कामे मंजूर झालेली आहे. तर उर्वरीत परतूर व मंठा तालूक्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेद्वारे 2 ग्रीड पाणी पूरवठा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्याकरीता जलजीवन मिशन अंतर्गत 745 योजना मंजूर असून, याकरीता 524.31 कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे. या योजना पैकी 258 योजनाचे 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर 319 योजना या पूर्णत्वाच्या टप्प्यात असून, उर्वरीत 164 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. जल जीवन मिशन योजनांच्या कामांसाठी राज्य व केंद्र शासनाकडून 215 कोटी निधी प्राप्त झाला असून, हा सर्व निधी खर्च झाला आहे. तसेच झालेल्या कामाचे देयके अदा करण्यासाठी शासनाकडे 104 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती जिप ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande