जालना ,5 ऑक्टोबर (हिं.स.)। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
श्रीमती कुलकर्णी यांनी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले स्नेही, मित्र तसेच कुटुंबातील सदस्यांना वर्षातून किमान एक तरी पुस्तक भेट देवून प्रोत्साहीत करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis