जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : पारोळाशहरापासून काही अंतरावर असलेल्या बायपासच्या वर राष्ट्रीय महामार्गावरून घरी परतत असताना शिक्षिकेला भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की महस्वे येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका भावना प्रशांत मुळे ५३ रा श्रीनाथ नगर पारोळा या सायंकाळ च्या सुमारास शाळेतुन आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना मागुन येणाऱ्या फॉर्च्यूनर कारने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिक्षिका भावना मुळे या म्हसवे (ता. पारोळा) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सायंकाळी पाच वाजता त्या शाळेचे कामकाज संपवून आपल्या ताब्यातील (एम.एच.१९ बीटी ०५७२) स्कुटीने घरी पारोळा येथे येत असताना समोरून भरधाव येणारी (जी. जे.२६-एके १७५०) फॉर्च्यूनर कार वरील चालक समाधान दिगंबर पाटील (रा अंतुर्ली ता. पाचोरा) याने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिसात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर