लातूर : पहिल्या टप्प्यात १ कोटी १७ लाखांची मदत खात्यात जमा
लातूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात लातूर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम अनेक कुटुंबांवर झाला होता. या आपत्तीग्रस्त भागांतील नागरिकांना दिलासा म्हणून पहिल्या टप्प्यातील ₹ १ कोटी १७ लाख ६० हजार रुपयांची मद
अ


लातूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात लातूर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम अनेक कुटुंबांवर झाला होता. या आपत्तीग्रस्त भागांतील नागरिकांना दिलासा म्हणून पहिल्या टप्प्यातील ₹ १ कोटी १७ लाख ६० हजार रुपयांची मदत थेट नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.

या तातडीच्या मदतीसाठी राज्य सरकार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच तत्काळ पंचनामे करून मदत वितरणाचे कार्य वेगाने पूर्ण करणाऱ्या प्रशासनाचेही मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त करते असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande