‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड - समीर कुलकर्णी
- मालेगाव स्फोट प्रकरणातील निर्दोष हिंदु धर्मयोद्ध्यांचा भव्य सत्कार कोल्हापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। मालेगाव बॉम्बस्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेले एक मोठे कुभांड होते. देशातील अन्वेषण
समीर कुळकर्णी सत्कार


मेजर रमेश उपाध्याय सत्कार


- मालेगाव स्फोट प्रकरणातील निर्दोष हिंदु धर्मयोद्ध्यांचा भव्य सत्कार

कोल्हापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। मालेगाव बॉम्बस्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेले एक मोठे कुभांड होते. देशातील अन्वेषण यंत्रणा स्वतंत्रपणे काम न करता, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचत होत्या. त्यामुळे मालेगाव आणि त्यानंतर झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांचा तपास करण्याऐवजी तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्त्यांनी त्यात नाहक हिंदुत्वनिष्ठांना गुंतवले, असा स्पष्ट प्रतिपादन मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले समीर कुलकर्णी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील ‘देवल क्लब’मध्ये आयोजित ‘मालेगाव स्फोटात निर्दोष ठरलेल्या धर्मयोद्ध्यांच्या आणि त्यांच्या अधिवक्त्यांच्या सत्कार’ समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी ८०० हून अधिक हिंदू उपस्थित होते. कार्यक्रमात धर्मवीर समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता प्रीती पाटील आणि हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम भावे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्कारमूर्तींची वाहनातून सभास्थळापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

मालेगाव स्फोट झाला त्या दिवशी मी मुंबईत होतो, तरीही मला अटक करून मारहाण करण्यात आली. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, श्री. प्रवीण तोगाडिया, श्री श्री रविशंकर, योगी आदित्यनाथ यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला; पण मी शेवटपर्यंत त्यांची नावे घेतली नाहीत. त्यामुळे आमची जाणीवपूर्वक गोवण्यात आले. आमचे सामाजिक आणि आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त केले. केवळ राजकीय फायद्यासाठी आमच्यावर अन्याय झाला, असा धक्कादायक गौप्यस्फोट मालेगाव बॉंबस्फोटातून निर्दोष मुक्त झालेले तथा भारतीय सैन्य दलातील मेजर रमेश उपाध्याय यांनी कोल्हापुरात केला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात कोणताही संबंध नसतांना मला आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली. हत्येनंतर १५ मिनिटांतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही हत्या 'गोडसेवादी' लोकांनी केल्याचे जाहीर केले होते. यावरून पुरोगाम्यांचे आरोप किती बेगडी व नियोजित असतात, हे स्पष्ट होते. दडपशाही करून तुम्ही आम्हाला छळू शकाल; पण आम्ही हिंदुत्वाचे कार्य सोडणार नाही, असे ठाम प्रतिपादन ‘मालेगाव स्फोटामागील अदृष्ट हात’ व ‘दाभोलकर हत्या व मी’ या पुस्तकांचे लेखक विक्रम भावे यांनी केले.

काँग्रेससारख्या निधर्मी शासनकर्त्यांनी साम्यवादी आणि जिहादी शक्तींसोबत मिळून देशात ‘भगवा आतंकवाद’ असल्याचा पद्धतशीर अपप्रचार केला. यासाठी मालेगाव २००८, समझौता बॉम्बस्फोट, मडगाव स्फोट २००९, दाभोलकर-पानसरे हत्या अशा अनेक प्रकरणांमध्ये निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. या षड्यंत्राला बळी पडलेल्यांच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी केले.

या प्रसंगी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर गळा काढला जातो; मात्र साम्यवाद्यांनी देशात १४ हजार अधिक हत्या केल्या, याविषयी कुणी का बोलत नाही ? यापुढील काळात नाहक गोवलेल्या आणखीन काही हिंदुत्वनिष्ठांचाही सत्कार याच ठिकाणी आणि याच व्यासपिठावर होईल. आपल्याला समाजात हिंदूंच्या विरोधात चालू असलेली इकोसिस्टीमच्या विरोधात लढा द्यावा लागेल.

या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, उद्योजिका सौ. मनिषा वाडीकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande