छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (बुधवार) सकाळी आपल्या संपूर्ण कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात विधीवत अभिषेक पूजा केली आणि देवीच्या नित्य आरतीमध्येही सहभाग घेतला.
राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि कल्याण प्राप्त होवो, अशी प्रार्थना पालकमंत्री सरनाईक यांनी श्री तुळजाभवानी देवीसमोर केली.
या प्रसंगी तहसीलदार तथा मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागत केले. यावेळी मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis