रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनी नाचणे शाळा क्र. १ (ता. रत्नागिरी) शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाला भेट दिली.
जवळपास दोन तास विद्यार्थ्यांनी ग्रंथवाचन केले. पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद लुटला.
यावेळी शाळेतील विद्यार्थी आरुषी काजरोळकर हिने ग्रंथपाल सौ. अंतरा रहाटे यांची मुलाखत घेतली. शाळेचे
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, कोषाध्यक्ष विश्वनाथ बापट, ग्रंथपाल अंतरा रहाटे, शर्मिला बांदिवडेकर, वैष्णवी बोरसुतकर, पूजा हळदणकर आदी उपस्थित होते.
वाचन प्रेरणा दिन अनोख्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी