पुणे, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना बस, मेट्रो, एसटी, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, सुरक्षितपणे स्थानक व थांब्यांपर्यंत तसेच, रस्ता ओलांडण्यासाठी महामेट्रोकडून कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) उभारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ सहजपणे घेता येणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीसाठी उभारलेला हा शहरातील पहिला पादचारी सेतू ठरणार आहे.नाशिक फाटा चौकात निगडी ते दापोडी दुहेरी बीआरटी मार्ग आहे. भोसरी, चाकण ते पुणे अशी बस सेवा आहे. कासारवाडी रेल्वे स्थानक आहे. पुणे-नाशिक महामार्ग असल्याने येथील एसटी थांब्यावरून नाशिकला ये-जा करता येते. मेट्रोचे नाशिक फाटा स्थानक या चौकात आहे. जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलावरून कासारवाडीहून भोसरीला जाता येते. उड्डाण पुलावर नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे या चौकातून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु