नांदेड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे शेतकरी राजाचे अतोनात नुकसान झाले या कर्तव्याची जाण ठेवत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्याता निधीस एक लाख एक हजार रुपये दिले
राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून त्या मदतीत खारीचा वाटा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्याता निधीस एक लाख एक हजार रुपये दिले. या निधीचा धनादेश वसंत सुगावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मना.मकरंद पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ.प्रतापराव पा.चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर,उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पा. रावणगावकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis