निवडणुकीसाठी सज्ज व्हा-मंत्री जयकुमार रावल
दोंडाईचा येथे भाजपची बैठक; पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप नंदुरबार, 15 ऑक्टोबर (हिं.स.) आगामी नगरपालिका निवडणूक ही दोंडाईचा शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. संघटन मजबूत करून कार्यकत्यारनी सज्ज व्हावे. मागील कार्यकाळात जनतेने आपल्याला
निवडणुकीसाठी सज्ज व्हा-मंत्री जयकुमार रावल


दोंडाईचा येथे भाजपची बैठक; पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप

नंदुरबार, 15 ऑक्टोबर (हिं.स.) आगामी नगरपालिका निवडणूक ही दोंडाईचा शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. संघटन मजबूत करून कार्यकत्यारनी सज्ज व्हावे. मागील कार्यकाळात जनतेने आपल्याला दिलेल्या संधीचे सोने करीत आपण मोठा विकास करून दाखविला आहे. हीच विकासाची घोडदौड तशीच कायम ठेवण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून विकासाच्या गतीला नवी चालना देण्याचे काम आपण सवारनी मिळून करायचे आहे. त्यासाठी आपण सवारनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने आपण सज्ज व्हावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. दोंडाईचा येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरातील नव नियुक्तीे पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम पार पडला, यावेळी मंत्री रावल यांनी पदाधिकारी व कार्यकत्यारना संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने, माजी जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, माजी उपनगराध्यक्ष नबू पिजांरी, माजी नगरसेवक विजय मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande