कोल्हापूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.) - नांदणी येथील मठातील आणि सध्या ‘वनतारा’ येथे असलेल्या माधुरी हत्तीणीच्या संदर्भात उच्चस्तरीय समितीसमोर सुनावणी होणार होती. या सुनावणीच्या अगोदर प्राण्यांसाठी काम करणारी संघटना ‘पेटा’ने वनतारा आणि नांदणी मठ यांनी सादर केलेल्या उत्तरावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उच्चस्तरीय समितीसमोर माधुरी हत्तीच्या संदर्भातील सुनावणी झाली नाही.
‘पेटा’ने घेतलेल्या आक्षेपात माधुरी हत्तीणीचे आरोग्य आणि तिला होत असलेल्या आजाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हत्तीणीच्या आरोग्याविषयी स्पष्टीकरण आवश्यक आहे, असे पेटाचे म्हणणे आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ‘हाय पॉवर कमिटी’ वर्ग केले आहे. त्यामुळे आता लवकरच उच्चस्तरीय समिती सुनावणीची नवी तारीख घोषित करेल. यामुळे माधुरीचा परत येण्याचा मार्ग लांबत चालला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी