नाशिक, 15 ऑक्टोबर (हिं.स.)
: महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा एनएसयुआयच्या प्रवक्ते पदी प्रथमेश वर्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड तसेच महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.चे अध्यक्ष सागर साळुंके यांच्या आदेशानुसार नाशिक शहर जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष अल्तमश शेख यांनी जाहीर केली.
गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेत सक्रियपणे कार्यरत असलेल्या प्रथमेश वर्दे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक हक्क आणि युवकांच्या समस्यांवर सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV