पुणे शहरातून १८ गुन्हेगार दिवाळी पार्श्वभूमीवर तडीपार
पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १८ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त
पुणे शहरातून १८ गुन्हेगार दिवाळी पार्श्वभूमीवर तडीपार


पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १८ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.परिमंडळ पाचच्या कार्यक्षेत्रात हडपसर, काळेपडळ, वानवडी, बिबवेवाडी, लोणी काळभोर, मुंढवा आणि फुरसुंगी पोलिस ठाण्यांचा समावेश होतो. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही महिन्यांत २२ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यांतर्गत ७८ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, तसेच ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande