पुणे जिल्ह्याचा नुकसानीचा अंतिम अहवाल तयार, ३४ कोटींची मागणी
पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाला असून, नुकसानीचा आकडा २१ हजार ९९३ हेक्टरवर पोहोचला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी ३४ कोटी ६१ लाख ६३ हजारांची आवश्यकता आहे.पंचनामे पूर्ण हो
पुणे जिल्ह्याचा नुकसानीचा अंतिम अहवाल तयार, ३४ कोटींची मागणी


पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाला असून, नुकसानीचा आकडा २१ हजार ९९३ हेक्टरवर पोहोचला आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी ३४ कोटी ६१ लाख ६३ हजारांची आवश्यकता आहे.पंचनामे पूर्ण होण्यास विलंब झाल्याने अहवाल अंतिम होण्यास ऑक्टोबरचे पंधरा दिवस गेले. आता एका आठवड्यात दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार का, असा प्रश्‍नच आहे.राज्यासह पुण्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले. शेती, जमीन, जनावरे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १५ सप्टेंबरपर्यंत पुण्यात २७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने सुरुवातीला व्यक्त केला होता. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.दहा तालुके बाधित होऊन जवळपास ५२ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. सर्वाधिक नुकसान इंदापूर तालुक्यात झाले. इंदापूरमध्ये ११ हजार ६९६ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. त्यामध्ये २० हेक्टर जिरायती, दहा हजार ४१५ हेक्टर बागायती; तर एक हजार २६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. पुरंदर तालुक्यात दोन हजार ७६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात जिरायतीमधील ४७२ हेक्टर, बागायतीमधील दोन हजार २८६ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले.पुण्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये दहा तालुक्यातील ५२ हजार ७८९ शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. त्यात सर्वाधिक इंदापूरमधील २७ हजार ३०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पुरंदरमधील आठ हजार ४५६ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यापाठोपाठ जुन्नरमधील चार हजार १४०, हवेलीमधील तीन हजार ६९३, आंबेगावमधील तीन हजार २२१, शिरूरमधील दोन हजार ३०३ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande