पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांची 'इकोसिस्टम' उद्ध्वस्त करणार - पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। फक्त व्यक्तींना अटक करणे हेच शेवटचे उद्दिष्ट नाही. तर त्या लोकांचे संपूर्ण ‘इकोसिस्टम’ लक्षात घेऊन तोच नष्ट करणे हे पोलिस दलाचे काम आहे, असे पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पुणे मर्चंट चेंबर्सच्या लाड
CP Pune


पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। फक्त व्यक्तींना अटक करणे हेच शेवटचे उद्दिष्ट नाही. तर त्या लोकांचे संपूर्ण ‘इकोसिस्टम’ लक्षात घेऊन तोच नष्ट करणे हे पोलिस दलाचे काम आहे, असे पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुणे मर्चंट चेंबर्सच्या लाडू-चिवडा कार्यक्रमाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गुन्हेगारी करणाऱ्या व कायदा तोडणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला.जे कुणी क्रिमिनल असतील, पूर्वी होते किंवा सध्या आहेत आणि ज्यांचे इतिहासात गुन्हेगारी नोंद असेल, परंतु ते कायद्याच्या मार्गाने वावरत नाहीत, त्यांच्याप्रती आम्हाला वैयक्तिक दुश्मनी नाही. मात्र, जे कायद्याचा भंग करतील, जे गुन्हे करतील, त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुणे शहर पोलिस दल सोडणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande