पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी
PMC news


पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीवर काम सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.पुणे महापालिका निवडणुकीसाठी १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी ४ सदस्यांचे ४० प्रभाग आणि ५ सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत जी मतदार नोंदणी केली होती, ती यादी महापालिका निवडणुकीसाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जुलैनंतर ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे, त्यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande