वाचक हेच वाचन संस्कृतीचे रक्षक - डॉ. मिलिंद दुसाने
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। वाचन संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी वाचक म्हणून आपली आहे. शासनाच्या वतीने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम, ज्ञान, साहित्य निर्मितीचे उपक्रम राबविले जात आहेत. वाचक म्हणून शासनाच्या या प्रयत
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। वाचन संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी वाचक म्हणून आपली आहे. शासनाच्या वतीने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम, ज्ञान, साहित्य निर्मितीचे उपक्रम राबविले जात आहेत. वाचक म्हणून शासनाच्या या प्रयत्नांना आपली साथ असणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज केले.

शासकीय विभागीय ग्रंथालयात आज माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व वाचकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, ग्रंथालय भारतीचे अध्यक्ष डॉ. रा. शं, बालेकर, विक्रमशिला कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्य श्रीमती अर्चना साळवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, सुभाष साबळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन व वाचकांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. दुसाने यांनी सांगितले की, डिजीटल वाचन आणि ग्रंथ वाचन या प्रक्रियेचा मानवी मेंदूवर होणारा परिणाम अभ्यासणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्राचा वापर करतांना आपली भावी पिढी ग्रंथ वाचनापासून दूर जाणार नाही याची काळजी आपण घेणे आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande