मुंबई, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १५) राजभवन येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या आवडत्या मराठी पुस्तकांमधील लेख व उतारे वाचले तसेच काव्य वाचन सादर केले.
सुरुवातीला राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर