सोलापूर - महापालिकेच्या बदललेल्या प्रभाग रचनेने अनेकजण डेंजर झोनमध्ये
सोलापूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. या प्रभाग रचनेत दहा प्रभागात बदल करण्यात आले. भाजपच्या खेळीमुुळे अनेक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग डेंजर झोनमध्ये गेले आहेत. भाजपच्या खेळीने महापालिकेच्या निवडणुकीची समीकरणे ब
smc


सोलापूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. या प्रभाग रचनेत दहा प्रभागात बदल करण्यात आले. भाजपच्या खेळीमुुळे अनेक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग डेंजर झोनमध्ये गेले आहेत. भाजपच्या खेळीने महापालिकेच्या निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. याचा फार मोठा परिणाम उमेदवारी वाटप करताना होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेचे विरोधी पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले असले तरी काही प्रभाग विरोधकांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.प्रभाग 6, 10, 11, 12, 14, 15, 16, 19, 20 आणि 21 या प्रभागांमध्ये काही भागांची अदलाबदल करण्यात आली आहे. तसेच काही बूथचे स्थलांतरणही करण्यात आले.

प्रभाग सहामधील लक्ष्मी-विष्णू चाळ व एक्झीबीशन हॉल परिसर प्रभाग 15 मध्ये समाविष्ट करण्यात आला. यामुळे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे 15 मधून उभारण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 15 मधील मुल्लाबाबा टेकडी परिसर प्रभाग 14 ला जोडल्याने मुस्लीम मतदार कमी होणार आहेत. याचा परिणाम म्हणजे 15 मधील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या पॅनलला संघर्ष करावा लागेल. प्रभाग 14 मधील अश्विनी हॉस्पिटल परिसर प्रभाग 16 मध्ये समाविष्ट करण्यात आला, त्यामुळे काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल, नरसिंग कोळी यांना अडचण होणार आहे. प्रभाग 16 मधील विकास नगर, ईएसआय हॉस्पिटल, ईदगाह मैदान हा भाजपला मानणारा परिसर प्रभाग एमआयएमचे चार नगरसेवक असलेल्या 21 मध्ये समाविष्ट केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande